वर्धा: युसूफ पठान
आज. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने कलेक्टर वर्धा यांच्या मार्फत मा .ना . बावनकुळे महसुल मंत्री तथा अध्यक्ष ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले .
महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे व हैद्राबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस वारंवार सांगत असले तरी शासनातील मंत्री ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचे सांगत आहे तर तिकडे मनोज जरांगे पाटील गुलाल उधळून मराठा जिंकल्याचे सांगत आहे यामुळे ओबीसी समाज द्विधा मनस्थिती मधे असून पुरता घाबरलेला आहे .

खरे .तर हैद्राबाद गॅझेटियर मध्ये सामूहिक नोंदी आहे वैयक्तिक नोंदी नाही व व्ययक्तिक नोंदी शिवाय कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही . असे असताना सुद्धा मराठवाड्यातील जालना नांदेड हिंगोली धाराशिव व बीड येथे हैद्राबाह गॅझेटीयर वरून कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचे वेगवेगळ्या चॅनलवरून सांगितल्या जात आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . आपण ओबीसी समाजाला पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करावे व आपण जातीने लक्ष देऊन खालील बाबींकडे लक्ष देऊन त्या अमलात आणाव्या 1 . कोणत्याही परिस्थितीत मराठा जाती चा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये 2 . हाताने खोडतोड करून चुकीच्या व खोट्या पुराव्याच्या आधारे कुणबी मराठा कुणबी . कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊ नये 3 .खोट्या नोंदी तपासण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमण्यात यावी . 4 .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे जात पडताळणी व्हावी 5 . २ सप्टेबर 2025च्या शासन निर्णयामधील शेवटच्या पेरेग्राफ मधे गावातील कुळातील व नातेसंबंधातील व्यक्ती म्हणजे कोण ? याचा अर्थस्पष्ट करावा .
या सर्व बाबींना घेऊन आज राष्ट्रीयओबीसी महासंघा तर्फे कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, महाराष्ट प्रदेश कार्याध्यक्षा राष्ट्रीय ओबीसी म . महासंघ सौ .अर्चनाताई रा . भोमले , जिल्हाध्यक्ष सुनिलजी शिंदे,जिल्हाध्यक्षा सौ.रागिणीताई शेंडे, श्री .सुधीरभाऊ पांगुळ,श्री .शशिकांतजी वैदय, विष्णुभाऊ ईटनकर, भारतराव पाटील , राजेन्द्रजी कळसाईत बाळासाहेब पुसदेकर, वंदनाताई हिवंज ,कपीलजी थुटे, भारती नागतोडे, भाग्यश्री देशमुख, अल्काताई वानखेडे, सुप्रियाताई शिंदे,वर्षा दिलीप सुकळकर, श्वेता सचिन पिसुड्डे, धारिना ठावरे, वृशाली राजीव भोमले, शालीनीताई घोम .सुनिता ताई तळवेकर हिॅगणघाट तालुका कार्याध्यक्ष ,नुरी ताई शेख आणि बहुसंख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते .

