युसूफ पठान:-प्रतिनीधी
वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा मुख्यालय, कार्यालय इंदिरा सद्दभावना भवन, वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस संघटन मजबूत व्हावे यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक नवनियुक्त वर्धा जिल्ह्याचे जिल्हाप्रभारी मा. आमदार व मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक व मा. श्री. रणजीत कांबळे (वरिष्ठ उपाध्यक्ष महा.प्र.काँ.क) यांच्यासह वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी मा. श्री. सुरेश भोयर (देवळी वि.स.), मा.श्री.अतुल कोटेचा (वर्धा वि.स), मा. श्री. अनिल गायकवाड (आर्वी वि.स), मा. श्री.संजय वानखेडे (हिंगणघाट वि.स), मा. नगराध्यक्ष श्री. शेखरभाऊ शेंडे, मा.श्री.संदेश सिंगलकर (सरचिटणीस म.प्र.काँग्रेस कमिटी), मा.श्री.अभ्युदय मेघे (सचिव म.प्र.काँ.कमिटी), श्री शैलेशजी अग्रवाल राष्ट्रीय समन्वयक यांच्या उपस्थितीत पार पडली.
वर्धा जिल्ह्यातील ब्लॉक निहाय संघटनात्मक आढावा व कार्यकारणी सह जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत राबवल्या कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मनोजभाऊ चांदुरकर यांनी केले. आढावा बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी कार्यकारणी व संघटनात्मक आढावा सादर करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत
या प्रकारचे सुतोवाच केला. बैठकीत जिल्ह्यातील संघटन अधिक सक्षम आणि मजबूत दाखवा व येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी व रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मा. श्री. राजेंद्रजी मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून स्थानिक पातळीवर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले आणि काँग्रेस पक्ष हा समाजहितासाठी सदैव लढत राहील असा विश्वास व्यक्त केला. बुथ लेवल बांधणी व नवीन बि.एल.ए. तयार करा, मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे
अशा सूचना मा. आमदार व मंत्री श्री रणजीतदादा कांबळे यांनी बैठकीत दिले. बैठकीत जिल्ह्यातून आलेले काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत अनेक महिला व पुरुषांनी पक्षात प्रवेश केला व काहींना पदनियुक्त करून पत्र देण्यात आले. यावेळी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून सर्व सेल अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला पुरुष यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

