बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनिल वर्मा :- लोणार तालुक्यातील सावरगाव मुंडे येथे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ सृष्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, गुणवंताचा सत्कार यासह अन्य कार्यक्रमांचा सामावेश आहे.गोपीनाथ सृष्टी सावरगाव मुंडे तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुस्कार यावर्षी लोणार तालुक्यातील रायगाव येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त मेजर उत्तमराव आश्रुजी नागरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्यात ३२ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेतून देशसेवेसाठी अनमोल योगदान दिले आहे. शिपाई या पदापासून सुभेदार मेजर यासर्वोच्च पदापर्यंतची वाटचाल करत त्यांनी सैन्यसेवेत अमूल्य कामगिरी केली आहे. सेवा निवृत्तीनंतरही ग्रामीण भागात सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या थोर योगदानाची दखल घेत यंदाचा गोपीनाथ सृष्टी जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणारं आहे. हा पुरस्कार १४ डिसेंबर २०२४ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.शाहीर अनंत आप्पाराव मुंडे (रा. परळी) गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनावरील पोवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार संजय रायमुलकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर, ११ वाजता गुणवंतांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्काराचे वितरण व त्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम, होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. शिवाजीराव सानप तसेच आयोजन समिती गोपीनाथ सृष्टी यांच्याकडून करण्यात आले आहे.


