भंडारा जिल्हा प्रतिनिधी: – प्रीतम कुंभारे.
घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान १५दिवसात जमा करा अन्यथा नगर विकास संघर्ष समिती नगर पंचायत ला कुलूप ठोकणार*
मोहाडी: मोहाडी शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळाला अंदाजे २ वर्षापासून नगर पंचायत ने लाभार्थ्यांना शिल्लक राहिलेले अनुदान त्यांचा खात्यात जमा केले नाही. गरीब लाभार्थीने उसनवारी कडून, आपले दागिणे गहाण ठेवून लोहा, सिमेंट, वाळू घेतले घरकुल चे काम पुर्ण झाल्यावर ही अजुन पर्यंत त्यांना अनुदान देण्यात आले नाही. गरीब लाभार्थी वर उपासमारी ची पारी येऊन ठेपलेली आहे. पण नगर पंचायत ला अजुन पर्यंत जाग आलेली नाही.प्रधानमंत्री मोदी साहेब सर्वांना सांगतात की करोडो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पण मोहाडी शहरात वेगळीच परिस्थिती आहे. ईथे घरकुल मिळाले पण त्याचे पुर्ण अनुदान अजुन पर्यंत मिळालेले नाही. मग घरकुल योजनेचा फायदा काय? असा सवाल संतप्त जनता व्यक्त करीत आहे. अनुदान न देण्या मागचे कारण काय? की नगर पंचायत ने समोर पाठपुरावा केलाच नाही? हे न समजणारे कोडे आहे.

१५ दिवसाच्या आत प्रधानमंत्री आवास योजनेचा लभर्थ्यांना त्यांचा खात्यावर पुर्ण अनुदान जमा करण्यात यावे अन्यथा नगर विकास संघर्ष समिती व मोहाडी शहरातील लाभार्थी नगर पंचायत ला कुलूप ठोकण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये नगर विकास संघर्ष समिती चे बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, श्याम चौधरी, अफरोज पठाण, जयराम गायधने, प्रकाश मारबते, नितीन निंबार्ते, सोनू मेहर व लाभार्थी यांनी दिला आहे या कडे मोहाडी शहरातील नागरिकांचे विशेष लक्ष लागलेले आहे.


