निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
म्हसवड येथे उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक #अहिल्यादेवी_होळकर यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते प्रमुख मान्यवर आणि सर्व समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
काठी आणि घोंगडी राजवैभवाचे प्रतिक असुन धनगर समाज बांधवांच्या खांद्यावर सर्वसंपन्न वैभवाची घोंगडी असते तर हातात न्यायाची काठी असते, या भूमिपूजन सोहळ्यात धनगर समाज बांधवांनी माणदेशाची शान आणि धनगर समाजाचा स्वाभिमान असलेली काठी आणि घोंगडी व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची प्रतिमा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना भेट देऊन सत्कार केला त्या हृदयसत्काराचा स्वीकार करून उपेक्षितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भारत एक बलशाली, समृध्द,वैभवशाली राष्ट्र उभारणीसाठी सांस्कृतिक, ऐतिहासिक,धार्मिक, आर्थिक, राजकीय स्वरूपात योगदान देणा-या पुण्यश्लोक राजमाता #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे #त्रिशताब्दीवर्षे असल्याने सबंध वर्षेभर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची वेगवेगळ्या माध्यमातून मांडणी करुन त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. म्हसवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, या पुतळ्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतः स्वीकारणार असल्याची घोषणा नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी यावेळी केली.
आपल्या राज्यात महापुरुष व महान स्त्रियांची स्मारके उभारण्याचे काम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार करत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. यासाठी पावणेसातशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव याजन्मगावी १०० कोटी रुपये खर्च करून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे भव्य स्मारक उभे केले जात आहे.
माण तालुक्याचा विकास साधणे, दुष्काळ निर्मूलन करणे आणि तालुक्याच्या जनतेची अखंड सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. माण तालुक्याच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच आज मी मंत्रीपदावर पोहोचलो आहे. विरोधक केवळ टीका करण्यात व्यस्त असतात, पण महान नेत्यांच्या विचारांचे आचरण मात्र ते करत नाहीत, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यप्रेरणेने पुढील काळात समाजहिताचे कार्य करत राहणार आहे.अहिल्यादेवी होळकर या हिंदुहृदयसम्राज्ञी होत्या. त्यांनी १५ हजार हून अधिक मंदिरे पुनरुज्जीवित केली. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचे बीज जनमानसात पेरणे आणि ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे हीच माझी खरी जबाबदारी आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले.
म्हसवडसाठी नवे विकासप्रकल्प
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणीस प्रारंभ.
म्हसवड शहरात विविध विकासकामांना गती.
धनगर समाज सभागृहासाठी १ कोटींचे अनुदान, भव्य सभागृह उभारणीसाठी.
एमआयडीसी प्रकल्पाची उभारणी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगत व आधुनिक औद्योगिक वसाहत म्हसवडमध्ये उभारली जाणार.
शहरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन यावेळी दिले.
सातारा जिल्हा परिषद मा.सभापती शिवाजीराव शिंदे,मा.जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), माजी नगरसेवक ईश्वरा खोत,आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे,भाजपा माण तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, मा. नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ,मा.नगराध्यक्ष विजय धट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, मा.नगराध्यक्ष विजय सिन्हा, डॉ. प्रमोद गावडे, मा.नगराध्यक्ष नितीन दोशी, बाळासाहेब पिसे, नानासाहेब दोलताडे, ऍडव्होकेट दत्तात्रय हांगे,युवानेते लुनेश विरकर, डॉ.बाबासाहेब दोलताडे, शंकरशेठ वीरकर, इंजिनिअर सुनील पोरे साहेब, भाजपा प्रदेश किसान मोर्चा सचिव माऊली भाऊ हळणवर, भाजपा माण तालुका मा.अध्यक्ष बाळासाहेब मासाळ,लुनेश खोत सर,अल्पसंख्यांक_आघाडी भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष अकील काझी, नगरसेवक संजय सोनवणे, सदाशिव सावंत (आण्णा), अमोल माने, काकासाहेब माने, मा. नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवडचे मुख्याधिकारी सचिन माने,नगरसेवक आप्पा विरकर,शंकरशेठ विरकर,नारायण मासाळ,रामभाऊ कोडलकर,पोपट मासाळ, अमृत चौगुले,दीपक बनगर, जगन्नाथ वीरकर, सुरेश पुकळे, हनमंत राखुंडे , सचिन पुकळे, शुभम लिंगे, आकाश मेंढापुरे,आकाश पिसे, अनिकेत लांब यांच्यासह आदी मान्यवर, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, म्हसवड शहरातील व परिसरातील माता भगिनी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते.

