अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला:- अंगणात व शेतात ठेवलेल्या सोयाबीनचे कट्टे चोरून नेणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून२२ लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटके नंतर चौकशी दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या गोदामातील साहीत्य चोरल्याची कबुली आरोपींनी दिली असून एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली. अकोला येथील भंगार दुकाण शेख निसार शेख इद्रिस रा. हबीब नगर, खैर मोहम्मद प्लॉट व त्याचा सहकारी फारूक खान आसिफ खान रा. तारफैल यांना अटक केली आहे.


