वर्धा:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अधिवेशन निमित्ताने प्रबोधन मोहीम…..
विदर्भातील सर्व जिल्हा व तालुकाक्यात प्रबोधन……
वर्धेहून दि 7 डिसेंबर ला निघालेली प्रबोधन यात्रा 16 डिसेंबरला वर्धेतच होणार समापन….
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगष्ट 1989 रोजी स्थापन करून संत विचारवंत यांनी कालबाह्य अनिष्ढ रूढी परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी या विरूद्ध केलेल्या प्रबोधनाची चळवळ अधिक गतीशील करून विवेकी समाज निर्मितीसाठी केली त्याच्या संघटीत कामाला 35 वर्ष पूर्ण झाले तसेच संविधान स्विकृतीला 75 वर्ष झाल्याचे औचित्य साधून दि 27,28,29 डिसेंबरला आळंदी येथील मुंबई फ्रुट मार्केट धर्मशाळा येथे एक दिवस संविधान जनजागरण राष्ट्रीय परिषद तर दोन दिवसिय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे याची माहिती संपुर्ण महाराष्ट्रासह विदर्भात व्हावी या अधिवेशनाला सर्वसामान्य माणूस कार्यकर्ते पदाधिकारी समविचारी संस्था संघटना यांच्या सह सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा यासाठी दि 7 डिसेंबर पासून समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार पत्नी रजनी सुरकार व पुतण्या अक्षय सुरकार यांच्या सह संपूर्ण विदर्भातून प्रबोधन यात्रेची सुरुवात वर्धेवरून 7 डिसेंबर करून वर्धेलाच 16 डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे
अधिवेशनाचे उद्घाटन दि 27 डिसेंबरला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष मा अविनाश पाटील,धुळे तर राज्य कार्याध्यक्ष मा माधव बावगे, लातूर व विशेष अतिथी जवाहरलाल नेहरू विश्वविद्या पिठाचे प्राध्यापक व प्रख्यात संविधान अभ्यासक मा फैजल खान दिल्ली यां च्या उपस्थितीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार असून दिवसभरातील विविध सत्रात भारतातील अनेक मान्यवर संविधानातील विविध विषयांवर मांडणी करणार आहे तर दोन दिवसीय अधिवेशनाचे दहा सत्रे होणार असून सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव,प्रा सुभाष वारे, ॲड रमा सरोदे, प्रख्यात पुरोगामी किर्तनकार शामसुंर सोन्नर महाराज यांच्या सह महाराष्टातील अनेक तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मांडणी करणार आहे पहिल्या दिवशी रात्रीला भिमराव पांचाळे यांचा गझलांचा तर दुसरे दिवशी रात्री महाराष्टील काही ठराविक शाखा दर्जेदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे समारोपीय कार्यक्रम प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सायंकाळी दोन्ही दिवस कार्यकर्त्यांना विविध स्तरातील नियोजित राज्य स्तरीय पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेत लेखन करणारे उत्कृष्ट लेखक यांना रोख स्वरूपात, स्मृती चिन्ह,सम्मानपत्र अशा स्वरुपात भरगच्च कार्यक्रम राहणार आहे या अधिवेशनाला महाराष्ट्र व इतर अनेक राज्यांतील समविचारी संस्था संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते,मान्यवर यासह महाराष्ट्र अंनिसच्या 365 शाखांतील कार्यकर्ते पदाधिकारी सहपरिवार, मित्र मंडळी यांच्या सह उपस्थित राहणार आहे या अधिवेशनाला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम अमरावती या जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालूक्यातील शाखा तर वर्धा जिल्ह्यातील वर्धसह आंजी खरांगणा कारंजा घाडगे आष्टि आर्वी पुलगाव,देवळी सेवाग्राम,मांडगाव समुद्रपुर, हिंगणघाट गिरड या तालूका व गावात शहरात हि प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच समविचारी संस्था संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा यासाठी प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देणे यानिमित्ताने त्या त्या भागातील जिल्हा तालूक्यातील शाळा महाविद्यालये महिला मंडळ, बचतगट, यांना अंधश्रद्धा निर्मूलन, चमत्कार सादरीकरण , महिला व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रमही देवून विदर्भव्यापी जन प्रबोधन करण्यात येत आहे यानिमित्ताने दौऱ्यादरम्यान सर्वांना मोठ्या संख्येने तिन दिवसीय अधिवेशनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात येत आहे


