राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
कंळब:- तालुका कंळब अंतर्गत मेटीखेडा मंडळातील मार्कडा (गट ग्रामपंचायत कोळेझरी)येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच्या आश्विनी दिलीप पवार होते उदघाटक उपसरपंच गौतम थुल होते. तहसीलदार धीरज स्थूल यांच्या मार्गदर्शन खाली कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्कडा येथे घेण्यात आली आहे.नुकतेच शाळेचे सत्र सुरू झाल्याने, विद्यार्थी व पालक यांना विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्याकरिता अप्पर तहसिल मेटीखेडा व तहसील कळंब पर्यंत पायपीट करावी लागते. तसेच शेतकरी बांधव, निराधार वृध्द लोकांना एकाच छताखाली विविध प्रकारचे प्रमाणपत्रे मिळणे सोईचे व्हावे याकरिता, मेटीखेडा मंडळातील मार्कडा येथे दि 4आगस्ट 2025 सोमवारी सकाळी 11 वाजता पासून 5 वाजेपर्यंत महाराजस्व अभियान विविध योजना व दाखला च्या नोंदी करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, ऍग्रीस्टाग नोंदणी, निराधार नोंदणी, उत्पन्न ,गृहचौकाशी अहवाल,7/12 , फेरफार वाटप इत्यादी विविध विभागाचे कर्मचारी हजर राहुन कामे करणार आहेत.
या महाराजस्व अभियानाचा लाभ मेटीखेडा मंडळातील आधिवास 7जातींचे प्रमाणपत्र 17,उत्पन्न दाखला 53अपाक नोंद 9वारस नोदणी 7सात बारा 8अ 42निराधार 22,PM किसान 12,ऍग्रीस्टाग 6’राशन कार्ड 98,राष्टीयत्व 2,नान क्रिमिलीयर 8,आधार अपडेट 42,आयुष्यमान कार्ड 45,रहिवाशी 9जन्म दाखला 1नमुना 8-09असे एकून 386विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले मार्कडा ता.कळंब येथे महा राजस्व अभियान पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच्या आश्विनी दिलीप पवार होते यावेळी तहसीलदार धिरज स्थूल अप्पर तहसीलदार कार्यालय चे नायब तहसीलदार अनिल राजगुरे डॉ. आशिष कांबळे,, वेध्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी मेटीखेडा, जिवन अमृत मेश्राम वनरक्षक मार्कडा मेटीखेडा मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गरकळ,विरेंद्र चव्हाण पत्रकार जि. एम. राजहंस तलाठी मार्कडा वैशाली थुल सचिव गट ग्रामपंचायत कोळेझरी तलाठी डी. एम. काळे, गजानन साखरकर तलाठी, पूनम सेजल तलाठी मेटीखेडा अनिल गेडाम तलाठी पालोती एम.ऐ.मशराम (NHV), एस. एम. इरपाते आरोग्य सेविका,नितीन बकाले (MPW) सुनीता राठोड (सुपरवायजर)लक्ष्मी चिंचाळकर(आशा)अर्चना मेश्राम(CRP)ग्रामसंघ मार्कंडा विशाल अवथले, बंडू राऊत, प्रल्हाद भाऊ, बंडू ढगे पोलीस पाटील मार्कडा, कोळेझरी पालोती, पार्डी, प्रधानबोरी, झाडकिन्ही, मेटीखेडा, ,व परिसरातील महिला भगिनी व नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली.

