कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर वाढत्या अन्यायकारक व बेकायदेशीर हस्तक्षेपाच्या निषेधार्थ, कुरेशी समाज संघर्ष समितीने मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. हे निवेदन शेगाव येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यात आले.या निवेदनात शासनाने समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, राज्यभर तीव्र व संविधानिक आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.कुरेशी समाजाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत…
कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर होणारा बेकायदेशीर हस्तक्षेप तात्काळ थांबवावा.गोरक्षकांच्या नावाखाली समाज बांधवांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार थांबवावेत.पोलिसांकडून व्यवसायिकांवर करण्यात येणारे अनावश्यक गुन्हे (FIR) दाखल करणे बंद करावे.
व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करून, व्यवसायास कायदेशीर संरक्षण आणि हमी द्यावी.संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुरेशी समाज हा अनेक पिढ्यांपासून आपल्या पारंपरिक व्यवसायाशी जोडलेला आहे.
मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्यावर होत असलेले अन्याय, त्रास आणि कायदेशीर अडथळे वाढले असून, यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले असून, लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाज संविधानिक मार्गाने राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगांव जिल्हा बुलढाणा

