शहापूर तालुका प्रतिनीधी – कैलास शेलवले
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात आईच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळं आईनेचं आपल्या पोटच्या तिन्ही अल्पवयीन मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तिघींना जेवणातून विषबाधा झाल्याने तिन्ही मुलींची प्रकृती खालावल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन व घोटी येथील एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले एक अशा तिन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ
दरम्यान, एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी मुलींना विषबाधा झाली की दुसरे काही आहे, याबाबतचा तपास देखील सुरु आहे.
दरम्यान, या तिन्ही मुलींच्या मृत्यूबाबत मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका वाटत असल्यानं पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं आहे. मुलींच्या आईची पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मुलींना त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच तुन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका मुलींचा मृत्यू कशामुळं झाला याची माहिती समोर येणार आहे. मात्र, विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत.
नात्याला काळीमा फासणारी घटना, आईनेच घेतला पोटच्या तीन मुलींचा जीव, धक्कादायक घटनेनं शहापूर हादरलं.

