राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका कार्यवाह यांची सभा यवतमाळ येथील अभ्यांकर कन्या शाळेत दिनांक 27/7/2025 रोजी दुपारी ठिक दिड वाजता संपन्न झाली. त्या सभेमध्ये तीन विषय चर्चेला ठेवण्यात आले होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मागील जिल्हा अधिवेशनाचे काही पावती पुस्तके व रक्कम जमा करणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळावर जिल्हा कार्यकारिणीतून एक प्रतिनिधी पाठवणे, या सभेत वरील दोन विषयांवर चर्चा झाल्यानंतर सर्वांच्या सहमतीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष, सदैव संघटनेच्या कामात व्यस्त असणारे प्रताप विद्यालय बाभुळगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद मेश्राम सर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली.त्या सभेला अध्यक्षपदी प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी प्रांतिक विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे सर , यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर व जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर उपस्थित होते. या सभेला यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी आणि जिल्ह्यातील तालुका कार्यवाह आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब सोनेने सर यांनी केले तर आभार संतोष हेडाऊ सरांनी मानले.
ही निवड अत्यंत आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी अरविंद देशमुख, पवन बन, रामकृष्ण जिवतोडे, मुरलीधर धनरे, आनंद मेश्राम, मनोज जिरापुरे, साहेबराव धात्रक, श्रावनसिंग वडते, श्याम बोडे,श्रिकांत अंदुरकर, गणेश धर्माळे, दिवाकर नरूले, उमाकांत राठोड,उमेद डोंगरे, विठ्ठल परांडे, गुलाब सोनोने, संध्या जिरापुरे, महेश अंदुरे, गंगाधर गेडाम, संतोष हेडाऊ, अरूण गारघाटे, भुपेंद्र देरकर,गजेंद्र काकडे, पंकज राठोड, वैशाली अरविंदराव चौधरी, विलास वाघमारे, गोपाल बुरले, गजानन रासडमगुवार, दत्तात्रय महाकुलकार, धनराज ठेपाले ना. रा. मुरखे, लक्ष्मण मेंद्रान, पंजाब चंद्रवशी, किशोर भगत, सुरेश कन्नाके, दिगांबर बातुलवार, बाळकृष्ण मंदाडे, दिलीप सिर्तावार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

