बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
लोणार : सावरगाव तेली येथील पुलावरून वाहून जात असलेल्या महिलेस तरुणांनी पुरात उड्या घेऊन वाचविले. आज दुपारी ही घटना घडली.
तालुक्यातील सावरगाव तेली येथील यशोदा उखाजी चव्हाण ही शेतकरी महिला शेतातून घराकडे जात होती. सावरगाव तेली व तांडादरम्यान नदीच्या पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि तोल जावून महिला पुरात पडली. वाहून जात असल्याचे दिसताच उपस्थित नीलेश गाडेकर, उमेश सौंदर, उमेश लांडगे यांनी पाण्यामध्ये उड्या घेऊन महिलेचे प्राण वाचविले.
पुलाची उंची जास्त नसल्याने थोडा जरी पाऊस पडला की पुलावरून पुराचे पाणी वाहते. पुलाची उंची वाढवावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे.

