राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
बारमाही पाणी असलेल्या वर्धा नदीकाठावरील गावं, कळमनेर. राळेगाव शहराची तहान देखील हेच गावं भागवते, इथून राळेगाव ला जाणारी पाणी पुरवठा योजनाच मुळात कळमनेर पाणी पुरवठा म्हणून ओळखली जाते. असे असतांना देखील याच गावातील महिलांना भर पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नाही. चिखल तुडवत, जीवावर उदार होऊन पिण्याचे पाणी आणण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे.’
धरण उशाला पन कोरडं घशाला ‘
अशी परिस्थिती इथे निर्माण झाल्याने गावकरी संताप व्यक्त करतांना दिसतात.राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कळमनेर या गावातील संपूर्ण नागरिकांना पिण्याचे पाणी गेल्या पन्नास साठ वर्षांपासून गावाच्या बाहेर असलेल्या एकाच हँडपम्प वरून आणावे लागते हँडपम्प गावाच्या बाहेर असल्याने तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे पावसाळ्याच्या काळात तो रस्ता पूर्ण चिखलमय होत असते
कळमनेर हे गाव गट ग्रामपंचयात असून गावातच ग्रामपंचायत कार्यलय देखील आहे मात्र ग्रामपंचायतीने त्या चिखल मय झालेल्या रस्त्यावर साधा दोन ट्रॅक्टर मुरूम सुद्धा त्या चिखलमय झालेल्या रस्त्यावर टाकण्याचे कर्तव्य देखील ही ग्रामपंचायत पार पाडू शकली नाही मागील एक महिन्या अगोदर याच ठीकानी सोलार पंप लावण्यात आला मात्र तोही कुचकामी ठरला आहे नळाची धार बारीक, टाकीला झाकण नाही, त्यात साचून राहत असलेले पाणी कोण पिणार हा प्रश्न निर्माण होत आहे.
कळमनेर येथील पूर्णपणे निष्क्रिय झालेल्या ग्रामपंचायत मुळे नागरिकांना असंख्य समस्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर बाबींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व योग्य त्या उपाययोजना करण्या बाबत ग्रामपंचायतीला आदेशीत करावे अशी नागरिकांची मागणी होत आहे

