सातारा जिल्हा प्रतिनिधी: – निलेश कोकणे
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक विकास युनियन यांच्यावतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न…
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अनेक प्रलंबित प्रश्न तसेच ग्राम रोजगार सेवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले त्या अनुषंगाने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन दहिवडी ता. माण येथे करण्यात आले होते. ग्रामीण विकासासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामरोजगार सेवकांचे काम हे अत्यंत महत्वाचे असते. गावात शासकीय योजनांची योग्य ती अंमलबजावणी करणे, शेवटच्या लाभार्थीपर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते सत्कार समारंभ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आणि महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक विकास युनियन संघटनेचे पदाधिकारी मान्यवर व कर्मचाऱ्यांशी ना.जयकुमार गोरे यांनी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन करून हा कार्यक्रम आयोजित करून सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
ग्राम रोजगार सहाय्यक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्या सौ.सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब), माण तालुका (म्हसवड मंडल)भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड, राज्याचे अध्यक्ष विलास कुमरवार ,माणचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे ,खटावचे गटविकास अधिकारी योगेश कदम, तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ.चंद्रकांत खाडे , डॉ.सागर खाडे, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रशांत साळुंखे, ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हाअध्यक्ष जे.के.काळे,रोजगार सेवक राज्यअध्यक्ष दत्तात्रय घार्गे, दयानंद एरंडे,नवनाथ नवगिरे, विकास शिंदे, राजन लिगाडे, गणपत फडतरे,अमोल काळोखे, माण तालुका कामगार सेना अध्यक्ष नवनाथ अवघडे,
रोजगार सेवक राज्य अध्यक्ष तुषार सणस यांच्यासह सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

