प्रतिनिधि: – नागनाथ लांजे
आजचा दिवस जगभरातील शिवप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व खांदेरी हे 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे 12 किल्ले ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक वैभवाचा हा सन्मान आहे.

