दि.१०/०७/२०२५ रोजी पो.स्टे. ला गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मलीक चौक अकोट फाईल भागात सार्वजनिक ठिकाणी बसुन काही ईसम ५२ ताश पत्याचा हातजितचा जुगारचा खेळ खेळत आहे. अशा खात्रीलायक बातमीची माहीती पो. नि. श्री. रहीम शेख यांना देयुन त्यांचे मार्गदर्शना खाली पोस्टॉफ एएसआय/१३८१ अनिस पठाण, पो हवा /२२२ योगेश काटकर, पोहवा /१५०० प्रशांत इंगळे, पो हवा ५५२ संतोष चिंचोळकर, पोहवा /२११४ हर्षल श्रीवास पो. कॉ./२३५७ गिरीश तिडके, पोका /२१५५ ईमरान शाह, पोका /२१५२ अमिर शेख असे मलीक चौक अकोट फाईल अकोला येथे जावुन आरोपी नामे
१) अजीम खान अकील खान वय २५ वर्ष. रा. इंदिरानगर, अकोट फाईल अकोला, २) सलीम शाह नजीर शाह वय ४० वर्ष रा. सोळासे प्लॉट, अकोट फाइल अकोला ३) जुबेर खान मंजुर खान वय ४० वर्ष रा. ताजचौक, अकोट फाईल अकोला, ४) सैयद फैजान सैयद बाकर वय २५ वर्ष रा. सोळासे प्लॉट, अकोट फाईल अकोला, ५) नियामत खाान सुलतान खान वय ६५ वर्ष रा. राजुनगर, अकोट फाईल अकोला, ६) शेख कलीम शेख कयुम वय ४० वर्ष रा. ताजचौक, अकोट फाईल अकोला, ७) रीयान अहमद जिया अहमद वय ३० वर्ष रा. सोळासे प्लॉट अकोट फाईल अकोला, ८) कलीम शाह मौला शाह वय ३५ रा. भारतनगर, अकोट फाईल अकोला, ९) शेख शारीफ शेख शमशेर वय २५ वर्ष रा. भारतनगर, अकोट फाईल अकोला, १०) मकसूद खान मंजुर खान वय २७ वर्ष रा. मलीक चौक, अकोट फाईल अकोला, ११) अब्दुल अमार अब्दुल हमीद वय ३० वर्ष रा. मोहमदीया मस्जीतजवळ रामदास मठ, अकोट फाईल अकोला यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन विविध कंपनीचे १० मोबाईल ज्यांची अंदाजे किंमत ९२००० रूपये व जुगारातील नगदी ९४०० रूपये असा एकुण १,०१,४०० रूपयाचा मुददेमाल जप्त करून गुन्हे नोंद करून कार्यवाही करण्यात आली आहे.
मा. पोलीस अधिक्षक सा अकोला यांचे “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत पो स्टे अकोट फाईल अकोला येथे जुगार अड्यांवर तसेच दारू विक्री करणारे ईसमांवर, दारू पिउन धिंगाणे करणारे व्यक्तिवर, तडीपार ईसमांवर, फरार आरोपीतांवर सतत कार्यवाही सुरू असुन अवैधधंदे करणारे आरोपींचे समूळ नष्ट करण्याचे काम या मोहीमे अंतर्गत सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक/श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक / अभय डोंगरे साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी/सतिश कुळकर्णी सा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / शेख रहीम, एएसआय /१३८१ अनिस पठाण, पो हवा /१५०० प्रशांत इंगळे, पो हवा /२२२ योगेश काटकर, पो हवा / ५५२ संतोष चिंचोळकर, पो हवा / २११४ हर्षल श्रीवास, पोका / २१५५ ईमरान शाह, पोका / २३५७ गिरीश तिडके, पोका / २१५२ अमिर शेख यांनी केली.

