रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत
उषा काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!! महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात”
हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे…
महाराष्ट्रातील मराठी माणूस ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला.आवाज मराठी माणसाचा..आवाज ठाकरेंचा..
तमाम मराठी माणसाला जे अपेक्षित होते तेच झाले तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्र सरकारनं राज्यात त्रिभाषा सूत्र म्हणजेच मराठी, इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला महाराष्ट्रातील शिवसेना(ठाकरे),महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला.
या विरोधात दादर जुहू चौपाटी येथे निषेध मोर्चाचे देखील दोन्ही पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शेवटी सरकारने जनमताचा विचार करून हा शासन निर्णय रद्द केला. त्याचा विजयी मेळावा आज वरळी डोम येथे अतिशय उत्साहात, जल्लोषात पार पडला..महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मनसे सैनिक, मराठी माता, भगिनी या मेळाव्यास उपस्थित होते. कोणताही झेंडा नाही..फक्त मराठीचा अजेंडा..! मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू आपल्या संपूर्ण कुटुंबीयास या मेळाव्यास उपस्थित होते. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.
या निमित्ताने का होईना मराठी माणूस पुन्हा एकत्र आला.ही एका नवीन राजकीय परिवर्तनाची नांदी ठरू शकेल.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मराठी भाषेची आपल्याच राज्यात होणारी उपेक्षा आणि अस्मिता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
स्थानिकांना नोकरीमध्ये जाणीवपूर्वक डावलले जात आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत.मराठी भाषा संस्कृतीला जर कमी लेखू नका..ठाकरे अजून जिवंत आहेत. मराठीचा प्रश्न राजकारणाच्या पलिकडे आहे.जेव्हा प्रश्न अस्मितेचा निर्माण होतो तेव्हा वैचारिक मतभेद बाजूला सारून एकत्र यावं लागत. असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
आता तमाम मराठी माणसाची एकच आशा आहे की ही एकीची वज्रमूठ येणाऱ्या काळात मराठी भाषा विरोधकांच्या काळजात धडकी भरविल्याशिवाय राहणार नाही.


