✒️ पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख✒️
आलापल्ली : दोन वर्षांपूर्वी बस स्थानक आलापल्ली जनतेच्या सेवेत आले. गावाच्या मध्यभागी बस स्थानकाची निर्मिती झाल्याने प्रवाशांची उत्तम सोय झाली. बस स्थानकाची निर्मिती झाली असली तरी यात अनेक बाबी अपूर्ण राहिलेल्या दिसतात.. बस स्थानकाच्या पुढचा भाग सिमेंट काँक्रेट टाकून सपाट करण्यात आला नाही. बस स्थानकाच्या पुढच्या भागाला संरक्षण भिंत बनवण्यात आली नाही. यामुळे बस स्थानकात अनेक अडचणी येत आहे. खाजगी वाहनधारक आपली वाहने सरळ बस स्थानकात घालततात. यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
पंचवीस हजार लोकवस्तीच्या बसस्थानकात वाहतूक नियंत्रक या एकमेव कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. सगळी कामे वाहतूक नियंत्रकाला करायची आहे. बस स्थानकाच्या संरक्षन भिंतीचे काम आणि पुढील जागेवर सिमेंट काँक्रेट टाकून सपाटीकरण करण्याचे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
आलापल्ली हे वर्दळीचे ठिकाण आहे. अहेरी, सिरोंचा, मूलचेरा, भामरागड, एटापल्ली या पाचही तालुक्याची वाहतूक येथून नियंत्रित होते. पाचही तालुक्यासाठी येथूनच बस वळतात. आगार अहेरी असले तरी पाचही तालुक्यासाठी प्रवास करणारे प्रवासी येथे उतरतात. दुसरी बस पकडतात. पंचेवीस हजार लोकवस्तीचे आलापल्ली हे गाव असल्याने स्थानिक प्रवाशांचा मोठा लोंढा येथे असतो. बस स्थानक अभावी जनता रस्त्यावर चहाटपरी, पानठेलाच्या आडोशाने उभी राहत होती. बस स्थानक झाले. बसण्यासाठी जागा तयार झाली. अन्य सुविधाचा अभाव आहे. बस स्थानकाच्या पुढे संरक्षण भिंत गरजेची आहे. बस येण्यासाठी जाण्या-येण्या पुरता रस्ता सोडून ही संरक्षक भिंत बांधणे गरजेची असताना याकडे दोन वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. बस स्थानकाच्या पुढील मोकळ्या जागेवर बस थांबतात. थांबणाऱ्या जागेला सिमेंट काँक्रीट टाकून मजबूत करणे आवश्यक होते. मात्र करण्यात आले नाही. येथे माती, गिट्टी पडून आहे. बस येथेच उभी राहते. उन्हाळ्या आणि हिवाळ्यात प्रवाशांवर पूर्ण धूळ उडते. आता होईल, नंतर होईल असे या कामाबाबत सांगण्यात येते. पण परिवहन विभागाकडून या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही.
दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झाले. बस स्थानकाचे अंदाजपत्रक बनवताना या अंदाजपत्रकात संरक्षण भिंत आणि समोरच्या मोकळ्या जागेचे सिमेंट काँक्रिटीकरण समाविष्ट केले नव्हते काय ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संरक्षण भिंत आणि सिमेंट काँक्रिटीकरण समाविष्ट असल्याची शक्यता आहे. कंत्राटदाराने हा भाग सोडून दिला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बस स्थानकाचा कंत्राटदार बस स्थानक बांधून मोकळा तर झाला पण ही दोन महत्त्वाची कामे सोडल्याने परिवहन विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. या कामाकडे परिवहन विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी प्रवासी जनतेची मागणी आहे
