अकोला जिल्हा प्रतिनिधी गणेश वाडेकर
अकोला जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत काळे काच चारचाकी वाहनांवर कलम १०० (२)/१७७ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण अकोला जिल्हयात दिनांक १८/०३/२०२५ ते १३/०४/२०२५ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली.
सदर मोहीम दरम्यानं शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे कडुन काळे काच चारचाकी वाहनांवर कलम १०० (२)/१७७ मोवाका अन्वये वाहनांवर एकुण ५४२ केसेस करून ३,०६,०००/- रू दंड आकारून ३८,०००/- रू दंड वसुल करण्यात आला आहे.
तरी नागरीकांनी आपले चारचाकी वाहनांवर काळे काच लावु नये, काळे काच लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

