कोल्हापूर जिल्हा प्रतिनीधी: – किशोर जासूद…
अंबपवाडी येथील नागरिकांनी रोखले काम…
मागील काही दिवसापासून स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या माती मारण्याचा उद्योग महावितर णचे काही कर्मचारी करत आहेत. ग्राहकाला आवश्यकता नसतानही
काहीजण महावितरण कडून आलो आहे असे सांगत त्यांच्याकडे महावितरणचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसताना ग्रामीण भागात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्मार्ट मीटर सक्ती आहे असे सांगून बदलण्याचा घाट घातला जात आहे.
ग्राहकाला एखादी वस्तू नको असताना विनाकारण त्याच्या माथी मारणे हे कोणत्या कायद्यात बसते. स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास अगोदर धन दांडग्यांच्या बंगल्यावर मोठमोठ्या कंपन्यांत बसवा शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

