कविता धुर्वे/राळेगाव प्रतिनिधी
राळेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या आपटी (रामपुर) ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गट ग्रमपंचायत आपटी (रामपुर)च्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माया कुमरे होत्या,तर प्रमुख अतीथी म्हणुन उपसरपंच शेषीकांत पिंपरे, व्हाईस ऑफ मीडिया महिला संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या महासचिव पत्रकार कविता धुर्वे,आपटीचे पोलीस पाटील नलुताई पिंपरे,मंचावर प्रामुख्याने उपस्थीत होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवण कार्यावर मान्यवरां कडुन प्रकाश टाकण्यात आला.
पत्रकार कविता धुर्वे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता मुलक समाजाच्या निर्मितीची मुहुर्तमेढ रोवली, त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सविधानाच्या माध्यमातुन न्याय दिला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला, अबला महिलांना सबला बनविण्यासाठी कायदे केले महीलावर बाबासाहेबाचे असंख्य असे उपकार आहे. आपण त्यांचे स्वप्न त्यांच्या 138व्या जयंती निमित्ताने पुर्ण करण्यासाठी एकजुटी प्रयत्न केले पाहीजे असे विचार त्यांनी मांडले,त्यानंतर मयुरी मरस्कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुरुषाच्या बरोबरीने महीलांना समान अधिकार देणारे पहीले महामानव होते या विषयावर विचार व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात उमेदच्या महिलासह पुरुषांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली पटेलपैक,वंदना मेश्राम, वैशाली पटेलपैक (उमेद) ललिता कोडापे,वर्षाताई वांगे, सुरेखा येरकाडे, अंगणवाडीसेविका विमलताई मडावी, मुक्ता चापेकर, आशा वर्कर अनिता पिपंरे दामोधर मरस्कोल्हे, प्रफुल पटेलपैक, पत्रकार कैलास कोडापे,यांनी परिश्रम घेतले.

