माहिती संकलन विभाग प्रमुख:- पियुष गोंगले
एटापली स्थानिक एटापल्ली तालुक्यातील इंदिरा वार्ड क्रं १४ कडे जाणिवपूर्वक वार्ड मेंबर्स चे दुर्लक्ष. वार्ड मेंबर्स लक्ष देत नाही लोकांना होते अडचणी.एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या वार्ड क्रं १४ कडे वार्ड मेंबर, ताराबाई लोकेश गावडे यांच्या दुर्लक्ष करण्यात येत आहे,दोन महिन्यांपूर्वी सांगुणही नाली सफाई करतं नाही या कारणांमुळे वार्डातील लोकांना होते अडचणी, या नाल्यांची सफाई करणे आवश्यक आहे. नाली सफाई करतं नाही.
या नाल्यांची सफाई न केल्याने वार्डातील लोकांना मच्छर व घांन दुर्गंध येतो. फक्त काय नगरपंचायत चे दुर्लक्ष करून चालणार नाही तर लवकरात लवकर नाली सफाई करुन घ्यावे. असे लोकांना वाटते आहे. नगरपंचायत चे लोक फक्त महीणा आले कि पगार घेतात आणि आफीस मधल्या कोणत्याही प्रकारचे काम करत नाही. तसेच या वार्डातील वार्ड मेंबर बदलवून द्यावे
किंवा वार्डातील कामे करत जावे असे लोकांचे म्हणणे.
लोकांचे प्रश्न
आम्ही का वार्ड मेंबर्स म्हणून असेच निवडून दिले आहे का, वार्डातील लोकांचा मोठा प्रश्न??

आम्ही वार्ड मेंबर्स या करीता निवडून दिले आहे कि ते आमचे काही काम करतील, ते तर करणार कि नाही?
वर्षभर तर कोणतेही काम करत नाही आणि मग वर्ष संपताच ग्रामपंचायतीचे कार्यकारी येतात की पाणी कर, विद्युत पुरवठा कर दिवस भरातून तिनं दा जाते विज, हे आहे नगरपंचायत चे लक्ष, त्या पुर्व कामं तर करा मग या कि आम्हाला वर्ष भर चे कर दया म्हणत.
नगरपंचायत ला सांगुणही नगरपंचायत झोपेत दिसुन येते. नगरपंचायत ने हे कामं करावेत असे मागणी.
💥फक्त एक दिवस दिखावा💥
फक्त एक दिवस नगरपंचायत एटापल्ली मधील दोन बाया पाठवले नाली आणी सफाई करायला. त्या नंतर पुन्हा कुणीही आलेले नाही साप करण्यासाठी ,आता किमान पाच दिवस लोटले सांगुन तरी नगरपंचायत एटापल्ली मधील कंत्राटी कामगार लक्ष देत नाही . लोकांना मच्छर व घांन दुर्गंध येतो या नाल्यांची सफाई दोन वर्षांपूर्वी पासून होत नाही आहे. नगरपंचायत लक्षात घेत नाही तर आम्ही तहसील कार्यालय पर्यंत जाऊ असे लोकांचे म्हणणे आहे ..
यावेळी उपस्थित वार्ड क्रं १४ येथील काही लोक
१) सिंधूबाई गोंगले
२) निर्मला गावडे
३) ज्योती उसेंडी
४) रजनिबाई कुळयेटी
५) सुरेश कर्मे
६) प्रविण करमरकर
७) मधुकर पुंगाटी
