यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-कैलास कोडापे
ना. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रयत्नातून मिळाल्या ५ नवीन बसेस
राळेगाव आगारात आज आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांच्या विशेष प्रयत्नातून ५ नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राळेगावमध्ये आमदार असतानाच त्यांनी बस स्थानक उभारणीचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले होते आणि आता नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत.
या प्रसंगी बोलताना मंत्री अशोकजी उईके यांनी ऑक्टोबरपर्यंत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणखी ५ बसेस राळेगाव आगाराला मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या असलेले सरकार हे जनतेच्या हितासाठी काम करणारे असून, महिलांचा सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचीही सेवा अधिक चांगली व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच स्थानिक पातळीवर सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, तुम्ही पाठपुरावा करा, असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.या वेळी तालुक्यातील भा. ज.पा.पदाधिकारी व राळेगाव आगारातील सर्व कर्मचारी वर्ग हजर होता.

