सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
दि, 13/04/2025, अर्धापूर
या ईद मिलन कार्यक्रमांमध्ये अर्धापूर शहरातील विविध धार्मिक , विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ते पुसद येथील युवा व्याख्याते व संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक सय्यद सलमान सर होते. त्यांनी आपल्या भाषणात सद्भावना राष्ट्रीय एकात्मता आजच्या काळात फार आवश्यक आहे. तसेच रमजान आणि रोज यांचा उद्देश समाज निर्मिती नैतिक मूल्य आदर्श जीवन इतर धर्माचा आदर आपल्या धर्माचा सन्मान या गोष्टीवर भर दिला. तसेच आज सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे बसायला पाहिजे जेणेकरून आपल्या मनामधील द्वेष आणि गैरसमज दूर होऊन एकोपा बंधुत्व निर्माण होईल. देशात शांतता आणि सद्भावना असल्या शिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. आज आपल्या देशात व्यसन, भ्रष्टाचार, अनैतिकता , वृद्धाश्रम हे खूपच चिंताजनक विषय निर्माण झाले आहे. याचे उपाय सुद्धा आपणच शोधले पाहिजे आपण आपल्या देशाला प्रगतीवर नेऊ शकतो.अशा प्रकारचे सदभावनाप्रिय विचार प्राध्यापक श्रेयस सलमान सरांनी आपल्या भाषणात ठेवले आलेल्या सर्वच अर्धापूरच्या नागरिकांनी कार्यक्रमातील विचारांना खूपच आदराने ऐकले आणि अशा प्रकारचे सद्भावनाप्रिय कार्यक्रम नेहमी होत राहो ही इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद,अर्धापूरचे अध्यक्ष अब्दुल्ला खान होते. तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा. सैय्यद सलमान सर पुसद होते. कार्यक्रमा नंतर शिरखुरमेची मेजवानी करण्यात आली अशा प्रकारे ईद मिलनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न झाला.
