गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
– रुद्राक्ष कंप्युटर सेंटर फुलसावगी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी ‘मी पाहिलेला बाबासाहेब’, ‘संविधान व बाबासाहेब’ तसेच ‘शिक्षण हेच खरे शस्त्र’ या विषयांवर निबंध सादर करत बाबासाहेबांचे विचार प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले नामवंत सामाजिक कार्यकर्ते डॉ. पुंडलिक आमले साहेब यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचे प्रेरणादायी पैलू उलगडले. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांचे विचार म्हणजे नवभारताचे भविष्य. शिक्षण, बंधुता, आणि न्याय या तीन स्तंभांवर उभारलेले त्यांचे तत्त्वज्ञान आजच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे.”
सर्पमित्र सचिन कोकणे व सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ यांची देखील विशेष उपस्थिती होती. ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रनायकाच्या स्मृतींनी भारलेला होता. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा जागवणारा, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरलेला हा कार्यक्रम रुद्राक्ष कंप्युटर सेंटरचे संचालक योगेश राठोड सर पुढाकारामुळे यशस्वीपणे पार पडला
