- राष्ट्कवी. संजय मुकुंदराव निकम,गायत्री नगर, कॅम्प, मालेगाव
महामानव
बाबा आंबेडकर
ज्ञान प्रहर
ज्ञान सागर
राज्य घटना कार
करी प्रहार
खुले केले रे
चवदार हे तळे
ज्ञानाच्या बळे
न्याय समता
विश्व बंधूता धर्म
जीवन मर्म
महामानव
बाबा साहेब लढे
दांभिक चिडे
घेतली दीक्षा
बौध्द धर्माची खरी
मिटवी दरी
महामानव
जगाचे हे भूषण
दिले शिक्षण
कुप्रथा बंद
स्त्रियांना अधिकार
केला उध्दार
महामानव
अचाट बुध्दीमत्ता
लोकांची सत्ता
बाबासाहेब
दुबळ्यांचा आधार
प्रेम अपार
महामानव
जगी हे प्रज्ञा सुर्य
अमर कार्य
