(अकोला जिल्हा प्रतिनीधी:- इमरान खान सरफराज खान)
अकोला: एकीकडे देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना दुसरीकडे या जल्लोषात अकोला शहरातील वाशिम बायपासजवळ समाजकंटकांनी वाद घातला. त्यामुळे दगडफेक झाली. अज्ञात व्यक्तीने वाहनावर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांनी अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.


