अकोला जिल्हा प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला जिल्ह्यातील जनता अनेक वर्षांपासून आपल्या भागात विमानतळ उभारण्याची मागणी करत आहे, परंतु ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या अकोला सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला आजही विमानसेवेपासून वंचित ठेवले गेले आहे, तर दुसरीकडे जवळच असलेल्या अमरावतीमध्ये विमानतळाचे उद्घाटन होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि जाकरिया फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर जनप्रतिनिधींना – दिनांक १६ एप्रिल रोजी अमरावती येथे होणाऱ्या विमानतळ उद्घाटन समारंभाचा पूर्ण बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे.
अकोला जिल्ह्याच्या दुर्लक्षिततेविरुद्धचा हा बहिष्कार एक शांततामय पण प्रभावी संदेश ठरेल. अकोल्याच्या जनतेला हे जाणवून देणे अत्यंत गरजेचे आहे की, त्यांचे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या अधिकारांसाठी आणि सन्मानासाठी ठामपणे उभे आहेत. अमरावती विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होते
