अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
रात्री दरम्यान वयोवृध्द फिर्यादीची बॅग बळजबरीने हिसकावुन पळुन जाणारे अनोळखी आरोपीतांना अटक करून गुन्हयातील चोरी गेलेला संपुर्ण १००% मुदद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा (रॉबरी) गुन्हा २४ तासात उघकीस आणलेबाबत.
पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे फिर्यादी नामे ठाकुरदास इसरदास नागवानी, वय ७३ वर्षे रा. सिंधी कॅम्प, अकोला यांनी रिपोर्ट दिला की, दि. १०/०४/२०२५ रोजी रात्री ०९/१५ वा दरम्यान फिर्यादी हे त्यांचे मोटार सायकलने इंटक ऑफीस समोर, खोलेश्वर, अकोला येथुन जात असतांना दोन अनोळखी ईसमांनी मोटार सायकलने फिर्यादीचे विरूध्द दिशेने येवुन फिर्यादीला अडविले व फियादीचे जवळ असलेली काळया रंगाची बॅग ज्यामध्ये नगदी १३,५०० रू, १०० अमेरीकन डॉलर वे ०८ नोटा व इतर कागदपत्र असे होते ती बॅग बळजबरीने हिसकावुन नेले वरून फिर्यादीने आरडाओरड केली असता दोन्ही अनोळखी ईसम हे त्यांचे मोटार सायकलने घटनास्थळावरून पळून गेले अशा फिर्यादीवे रिपोर्ट वरून अप कं ८९/२०२५ कलम ३०९ (४), ३(५) भारतीय व्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
