वर्धा जिल्हा प्रतिनिधी: – युसूफ पठाण
11 एप्रिल 2025
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार,
उपविभाग अधिकारी आकाश अवतरे, उपविभाग अधिकरी विलास नरवटे, तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे,वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे, विद्युत उपविभागीय अभियंता पावडे, सरपंच राजु नौकरकर, सरपंच विलास नवघरे,ठाणेदार विकास गायकवाड, संजय डेहणे, वामनराव चंदनखेडे, अंकुश ठाकूर जनतेच्या सेवेसाठी शासन थेट गावपातळीवर
या उपक्रमाच्या आठव्या दिवसाची सुरुवात वासी या गावातून झाली, जिथे शासनाच्या विविध विभागांनी थेट जनतेपर्यंत पोहोचत त्यांच्या समस्या ऐकून तात्काळ तोडगे सुचवले.
‘शासन तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत, शेतकरी, महिला, युवक, वयोवृद्ध, दिव्यांग आणि श्रमिक वर्गासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना शासकीय सेवा, योजना व सुविधा यांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
‘शासन तुमच्या दारी’ हा नुसता नारा नसून, जनतेसाठी समर्पित सेवाभावाची जिवंत कृती !
प्रश्नांना उत्तरे, अडचणींना तोडगे आणि गरजूंना न्याय – हाच या शिबिराचा उद्देश
या शिबिरामध्ये महसूल, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालविकास विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

