✒️ पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख✒️
तुमच्याही कुटुंबात पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक समोर आले होते. याचं वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्थात 9 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तसेच PAT म्हणजे संकलित चाचणी परीक्षा सुरू होणार आहेत.
राज्यातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून अर्थात 9 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तसेच PAT म्हणजे संकलित चाचणी सुरू होणार आहे.
खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षा व संकलित चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सातवीसाठीच्या वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी (PAT) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
या वेळापत्रकानुसार दिनांक उद्या 9 एप्रिल 2025 पासून परीक्षा सुरू होणार असून 25 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे. पाचवी ते सातवीसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
तर पहिली ते चौथीसाठी मर्यादित विषयांची PAT चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे, 21 एप्रिलपासून चौथी ते सातवी यांची वार्षिक परीक्षा देखील घेतली जाणार आहे म्हातारे होण्याआधी स्वर्गाहून सुंदर ‘या’ १० ठिकाणी जाऊन या ! गेला नाहीत तर आयुष्यभर पश्चात्ताप…
नाशिक-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! नवीन रेल्वे लाईनमध्ये ४ स्थानके, १२ बोगद्यांचा असणार आहे समावेश
वाईट दिवस भूतकाळात जमा होणार ; 11 एप्रिलपासून ‘या’ राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन !
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! आता कसारा घाटवरून ‘या’ शहरासाठी तयार केला जाणार नवा रेल्वे मार्ग ! 4 नवीन स्थानके, 12 बोगदे आणि…..
इंग्रजी व गणित विषयांचे PAT व वार्षिक परीक्षा एकत्र करण्यात आले आहेत. परीक्षा दोन्ही सत्रांमध्ये न घेता फक्त सकाळच्या सत्रातच घेण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सर्व शाळांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आता आपण वार्षिक परीक्षा आणि PAT चाचणीचे पाचवी ते सातवी पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कस आहे पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक
9 एप्रिल : पाचवी – मराठी (PAT)
11 एप्रिल : चौथी व सातवी – इंग्रजी (PAT)
19 एप्रिल : पाचवी ते सातवी – गणित / मराठी (PAT)
21 एप्रिल : पाचवी – मराठी (वार्षिक), सहावी – गणित (PAT), सातवी – गणित (PAT)
22 एप्रिल : तिसरी – मराठी (PAT), चौथी- मराठी PAT, पाचवी ते सातवी – हिंदी (वार्षिक परीक्षा)
23 एप्रिल : पहिली व दुसरी – मराठी, तिसरी व चौथी – इंग्रजी PAT, पाचवी – इंग्रजी वार्षिक परीक्षा, सहावी व सातवी – इंग्रजी PAT
24 एप्रिल : पहिली व दुसरी – गणित, तिसरी व चौथी – गणित PAT, पाचवी-गणित, सहावी व सातवी – विज्ञान
25 एप्रिल : पहिली व दुसरी – इंग्रजी, तिसरी व चौथी व पाचवी – परिसर अभ्यास 1व 2, सहावी व सातवी – सामाजिक शास्त्रे
