लातूर जिल्हा प्रतिनीधी: -मोहसीन खान्
समाजसुधारक आणि समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेना ( शिंदे गट ) उदगीरच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, महिला आघाडी नेत्या अरुणाताई लेंडाणे, युवासेनेचे प्रशांत ममदापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, महिला व युवासैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमास शिव बसव संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वजीत पाटील नावंदीकर यांची विशेष उपस्थिती होती.

