राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:-तालुकाक्यातील आपटी रामपूर येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला राळेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येथे असलेल्या आपटी रामपूर ग्रामपंचायत कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . गट ग्रामपंचायत आपटी रामपूर च्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मायाताई कुमरे होते.
तर प्रमुख अतिथी उपसरपंच शशिकांत पिंपळे ग्रामपंचायत सदस्य सचिव सातगरे सर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जोशना चिकटे मॅडम अंगणवाडी सेविका मदतनीस व्हाईस ऑफ मीडिया महिला संघटना जिल्हा शाखा यवतमाळ च्या महासचिव कविता धुर्वे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होत्या

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शाळा समितीचे अध्यक्ष सोनिकाठोळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले ग्रामपंचायत मध्ये झेंडावंदन सरपंच मायाताई कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर कामगारांना हक्क मिळवून देणारे कामगाराचे खरे नेते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन कामगारांचे कामाचे तास बारा तासा ऐवजी आठ तास केले पीएफ आणि ई एस आय योजना लागू केली वेतन आयोग लागू केला पेन्शन लागू केली कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वारसास नोकरीची तरतूद केली साप्ताहिक सृष्टीची तरतूद सी एल इ एल पी एस एल योजना लागू केली महिला कामगारास प्रसूती रजेची तरतूद केली दिवाळी बोनस तरतूद केलीएक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचे स्थापना झाली

हा दिवस मराठी मना साठी एकते चा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे संत तुकडोजी महाराज ,ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ,एकनाथ महाराज असे प्रसिद्ध संत आणि छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज ,सावित्री फुले ,ज्योतिबा फुले ,असे थोर विचारवंत दिले असे विचार मांडणाऱ्या कविता धुर्वे यांनी मांडले.
