अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर (कान्हेरी सरप)
अकोला शहरातल्या उड्डाणपुलावर आज दुपारच्या सुमारास एक युवक आपल्या टू व्हीलर एक्टिवाने अशोक वाटिकेकडून रेल्वे स्टेशन कडे जात असताना त्याची टू व्हीलर स्लिप झाली आणि त्यात तो युवक डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याची आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहे.
