अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर(कान्हेरी सरप)
अकोल्यात आज 3 मे रोजी दुपारच्या सुमारास पतीने आपल्या पत्नीसह चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आरोपी पती सुरज गणवीर वय अंदाजे 35 वर्ष असून त्यांनी आपली पत्नी वय 28 वर्ष तर 4 वर्षाची मुलगी यांची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविचदानासाठी रुग्णालयात पाठवीण्यात आला आहे.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेचा रामदास पेठ पोलीस पुढील तपास करितआहे?
