चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- सुगत गेडाम पोंभुर्णा.
आज दिनांक 3 रोजी :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा तालुक्यातील बांधकाम कामगारांना घरगुती भांड्यांची किट वाटप करण्यासाठी पोंभुर्णा क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. किटचे वाटप 3,4 व 5 या तीन दिवसात करण्यात येत आहे.
त्यासाठी बांधकाम कामगारांनी आज सकाळी 6.00 वाजता पासून पोंभुर्णा क्रीडा संकुल येथे हजर होते. बांधकाम कामगारांना 8.00 वाजता पासून किटचे वाटप सुरु करण्यात आले. भर उन्हात बांधकाम कामगारांना त्रास होऊ नये यांची काळजी घेण्यात आली, आरोग्य सेवा सुद्धा पुरवण्यात आली होती .
या कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यातील भाजप कार्यकर्ते प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, राहुल संतोषवार , रोशन ठेंगणे, सुलभाताई पिपरे, स्वेता वनकर, रोहीने ढोले, आकाशीताई गेडाम, वैशाली बोलमवार यांचे सहकार्य होते.

