हातकणंगले प्रतिनीधी : सचिन लोंढे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक जातीय जनगणनेच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निर्णयामुळे देशाला नवी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, आज हातकणंगले येथे सकाळी ११ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर-पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमात हातकणंगले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष शितल हावळे, कुंभोज शहर अध्यक्ष संभाजी चव्हाण, अतिग्रे शहर अध्यक्ष विश्वास पाटील, नगरसेवक रमजान मुजावर, विजय हुक्कीरे, दीनानाथ मोरे, मयूर कोळी, अण्णासाहेब चौगुले, रावसाहेब चौगुले, पंकज चौगुले, संजय नदीवाले, कृष्णात पाटील, राम पाटील, डॉ. एस. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, कृष्णात झलग, सुरेश खोत, चंद्रकांत कांबळे, कुमार कोळी, चंद्रकांत सुतार, आशिष भबान आणि अमित कांबळे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

