अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोल्यामध्ये आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज नितीन देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला असून शहरातल्या अकोला क्रिकेट क्लब मैदान या ठिकाणाहून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
शेतकऱ्यांना त्वरित कर्ज माफी द्यावी पिक विम्याची रक्कम द्यावी या अशा विविध मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
