प्रतिनिधी शहापूर तालुका सगीर शेख
खर्डी येथे उभारलेल्या नवीन उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णालय सुरू करून एवढा कालावधी झाल्यानंतरही अनेक सुविधांचा अभाव पहावयास मिळत आहे पेशंटला अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये ठेवण्यात येत आहे दाखल झालेल्या रुग्णांना सकाळपासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तसे तीन-तीन तास रुग्णालयात लाईट येत नाही आणि जनरेटरची सुविधा असून सुद्धा जनरेटर चालू केला जात नाही अशा अनेक समस्यांना रुग्णांना तोंड द्यावे लागत आहे
एवढा मोठा रुग्णालय असून शासन लक्ष देत नाही सदर रुग्णालयाच्या व्यवस्थेवर त्वरित लक्ष द्यावे रुग्णालयात रुग्णांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खर्डी शहर अध्यक्ष सगीर शेख च्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात येत आहेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्या नी रुग्णालयात भेट दिली असता रुग्णालय प्रमुख डॉ. शिंदे यांनी सांगितले की ग्रामपंचायत मधून पाणी पुरवठा मिळत नाही आणि स्वतः डॉ. शिंदे स्व खर्चाने रुग्णालयासाठी टँकर ने पाणी पुरवठा करीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेयावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस श्री. संजय वाढविंदे,खर्डी उपविभाग अध्यक्ष प्रकाश धाबे,खर्डी शहर अध्यक्ष सागीर शेख, महिला पदाधिकारी रुक्मिणी वाडेकर आणि विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सदा काकड व मनसे पदाधिकारी उपस्थित होते
