अकोला प्रतिनिधि इमरान खान सरफराज खान
अकोला:रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफेल संकुलात सूरज गणवीर उर्फ गोटिया नावाच्या व्यक्तीने आपली ३ वर्षांची मुलगी आयेशा गणवीर आणि २५ वर्षांची पत्नी अश्विनी गणवीर यांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घरगुती वादातून खून झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एसडीपीओ सतीश कुलकर्णी, एसएचओ अरुण परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
