लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान्
कामाचा दर्जा राखून जून २०२६ पूर्वी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या केल्या सूचना.
“लातूर येथे उभारण्यात येत असलेले ‘सारथी’चे विभागीय कार्यालय,मुला-मुलींची वसतिगृह, आणि इतर उपक्रमाच्या इमारत बांधकांमाची पदाधिकारी,वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पहाणी केली, वस्तीगृहाच्या १२ पैकी ७ व्या मजल्याचे काम सध्या सुरू आहे. एकूण काम प्रगतीपथावर असेल तरी, कामाचा दर्जा राखून जून २०२६ पूर्वी प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, जेणेकरून वस्तीगृहात मुला-मुलींना प्रवेश देता येईल आशा सूचना यावेळी अधिकारी व कंत्राटदार राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.

आज, मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारी लातूर शहराजवळील बार्शी रोड परिसरातील छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) विभागीय कार्यालय लातूरच्या बांधकामाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
यावेळी माजी आमदार आणि विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख,कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता राजेंद्र बिराजदार,सारथीचे प्रतिनिधी असलम शेख आणि अजय वाघमारे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲङ. किरण जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, संचालक हणमंत पवार आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, या लक्षित गटाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवणाऱ्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (‘सारथी’ ) वतीने लातूर येथे उभारावयाचे विभागीय कार्यालय व त्यासाठी २१ पदे, त्याचबरोबर या कार्यालयांतर्गत मुला मुलींची ५२० रहिवाशी क्षमता असलेली वस्तीगृहे ग्रंथालय, अभ्यासिका, कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र असा एकत्रित प्रकल्प महाविकास आघाडी आघाडी सरकारच्या कार्यकाळात आमदार देशमुख पालकमंत्री असताना मंजूर झालेला आहे, त्यासाठी लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ४ एकर जागाही त्याचवेळी उपलब्ध करून दिली आहे,
प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने वाढीव जागेचाही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी १७३ कोटी रुपयांच्या निधी मंजुरी असून त्या माध्यमातून प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. कामाची गती कायम राखावी, सर्व बांधकाम व इतर व्यवस्था दर्जेदार पद्धतीने पूर्ण कराव्यात त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही प्रकल्प उभारणीची पहाणी केल्यानंतर यावेळी संबंधितांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
