वर्धा जिल्हा प्रतिनीधी: – युसूफ पठाण
बोरगाव (मेघे) क्रीडा क्षेत्रात युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात त्यांच्यातील कलागुणांना दिशादर्शक ठरावे असे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे आज काळाची गरज आहे असे मत सेंट थॉमस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या प्रीती सत्याम यांनी व्यक्त केले.ते सत्येश्वर लॉन येथे स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संचालित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित भव्य मार्शल आर्ट, कराटे, योगा, डान्स, संगीत, इंग्लिश स्पिकिंग व लाठी काठी प्रशिक्षक शिबिर 2025 चे उद्घाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश ईखार, तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे संरक्षक इमरान राही, उपाध्यक्ष मोहन मोहिते, कोषाध्यक्ष विजय सत्याम, संचालक तथा दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार, विश्व सिंधी सेवा संगम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आहुजा, गॅरंटी इंग्लिश स्पीकिंग चे संचालक श्याम पठवा, सभासद प्रवीण पेठे, सुनील चंदनखेडे, मुख्य आयोजक तथा संस्था सचिव मंगेश भोंगाडे, योगा शिक्षक सौ. हेमलताताई काळबांडे, लाठी प्रशिक्षक अनुज कांबळे, महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक पूजा गोसटकर, डान्स प्रशिक्षक नेहा गोल्हर, व मार्शल आर्ट प्रशिक्षक कार्तिक भगत, तेजस निवल, स्नेहा बोधिले, भार्गव खेवले व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.आजच्या असुरक्षित व आव्हानात्मक वातावरणात मुला मुलींना बालवयापासून शालेय शिक्षणासोबत साहस व आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे
अशा प्रशिक्षणाचे धडे प्रत्येकाला दिल्यास साहसी व कर्तव्यदक्ष युवा पिढी घडविणे शक्य आहे असे विचार स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संरक्षक इमरान राही यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.मागील पंधरा वर्षापासून निरंतर स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा तर्फे बोरगाव मेघे या गावात भव्य मार्शल आर्ट, कराटे, योगा, डान्स, संगीत, इंग्लिश स्पिकिंग व लाठी काठी प्रशिक्षक शिबिराचे आयोजन दरवर्षी होत असल्यामुळे या शिबिराला मानाचे स्थान प्राप्त झाले असून यावर्षीही जवळपास शंभर विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेत आहे.कार्यक्रमाचे संचालन सौ. कल्याण भोंगाडे तर आभार वाणी साहू यांनी व्यक्त केले.
