अकोला जिल्हा प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अपघात वाचण्यात ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ५ जणांचा ट्रकखाली दबून मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी दहा वाजताच्या महान ते दोणद मार्गावर घडली. या घटनेची माहिती मिळताच फौजफाट्यासह बार्शिटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने रुग्णवाहिका व स्थानिक डॉक्टर घटनास्थळी. पोहचले.बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद फाटा जवळपास हा अपघात झाला असून वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीचा आणि ट्रकचा अपघात होण्याची संभावना टाळण्यासाठी ट्रक चालकाने केलेल्या प्रयत्नात कदाचित ट्रक पलटी होऊन मजूरांसह सहा जण ट्रकखाली दाबले गेले.

ही दुर्दैवी घटना दगडपारवा गावापासून दोन किलोमीटर अलीकडेच घडली असून जवळपासच्या भागात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी विटात दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण वृत्तलिहीस्तोवर त्यांना यश आले नाही.
शेवटी हाती आलेल्या माहितीनुसार २ जण घटनास्थळी ठार झाले असून काही गंभीर आहेत.

