यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-कैलास कोडापे
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिनांक 18/1/2025 रोजी सुरुवात झाली..
*कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक मा. चित्तरंजनदादा कोल्हे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे सचिव रोशन कोल्हे, संचालक शेखर झाडे, सुरेश गंधेवार, दिलीप देशपांडे, गुलाबराव महाजन ,सौ.निशिगंधाताई रोशन कोल्हे, बाबाराव किन्नाके सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक विलास निमरड, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होती. व नृत्य स्पर्धेचे उदघाटक मा.प्रदीपजी गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळव उमेशजी निमकर हे होते यामध्ये गावतील लखाजी महाराज कान्व्हेंट वं शाळेतील 5 ते 12 च्या सर्व विद्यार्थी विध्यार्थीनी यांनी वर्गनिहाय सामूहिक नृत्य सादर केले. तालुकास्तरीय कार्यक्रमा करीता ज्या दात्यानी बक्षिसे दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रामदासजीं किन्नाके, निखिल राऊत, प्रफुल कोल्हे, अनिल पिंपरे, नितीनभाऊ झाडें यांचा सत्कार करण्यात आला*
व बक्षीस वितरण करण्यात आले
दिनांक 19/01/2025 राळेगाव तालुका स्तरीय आंतर शालेय समृह नृत्य स्पर्धेला उद्घाटन मा प्रदिपजी गोडे उपशिक्षणाधिकारी यवतमाळ व मान्यवर मंडळीने केले .अंतिम निकाल
प्रथम- आर एम इंटरनॅशनल स्कूल राळेगाव
द्वितिय- नेताजी विद्यालय राळेगाव
तृतिय- श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव
चर्तुथ- सैनिक पब्लिक स्कूल वडकी
पाचवा- जि. प. उच्च प्राथमिक शाळा वरूड
प्रोत्साहनपर- स्मॉल वाँडर स्कूल वडकी
मुख्य परीक्षक- रोषन दूपारे वं सहकारी (काजू या मराठी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक) हे होते.
*दिनांक 20/01/2025 राळेगाव तालुका स्तरीय 17 वर्ष वयोगट मुले-मुली कबड्डी स्पर्धा
मुले गट-
प्रथम- सैनिक पब्लिक स्कूल वडकी
द्वितिय- न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव
तृतिय श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव*
मुली गट
प्रथम- श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव
द्वितिय- वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी
तृतिय- शासकीय आश्रमशाळा सावरखेड व लोक विद्यालय खैरी यांना संयुक्तपणे देण्यात आला या कर्यक्रमाचे बक्षीस वितरण या कार्यक्रमाला उपस्तित संचालक मंडळी व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आला व या कार्यक्रमाला फोटो ग्राफर मनून उत्कृष्ट सेवा देणारे लाखाजी स्टुडिओ मुकिंदा पवार झाडगाव
या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तकर्मचारी, विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
महाक्रांती न्यूज२४ आवाज जनतेचा