सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद / दिग्रस पत्रकारांच्या जागृतीमुळे हलगर्जीपणा करणाऱ्यावर वचक राहतेच त्यामुळे अनेक कामात पारदर्शकता दिसून येते एका बातमीत ती ताकद आहे आज घडीला पत्रकारांची आलेली बातमी आमच्या कामात असलेली चूक निदर्शनास आणणे प्रत्येक पत्रकाराचे कर्तव्य आहे ती चूक आम्हाला दुरुस्त करण्यास तुमच्या आलेल्या बातमी मुळे शक्य होते तेव्हा प्रत्येक पत्रकारांनी जागृतपणे आपले मत लेखणीच्या माध्यमातून मांडण्यास कुठेही कमी पडू नये असे प्रतिपादन दिग्रस तहसिलदार मयूर राऊत यांनी व्यक्त केलेदपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जानेवारी हा दिवस पत्रकारीता दिन म्हणून साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून २२ जानेवारीला मानवाधिकार पत्रकार संघटना दिग्रस च्या वतीने जिल्हातील पत्रकार संघटनेच्या अध्यक्षासह पत्रकारांचा जाहिर सत्कार दिग्रस येथील आयुष्यमान मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात संपन्न झाला
या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधीत करतांना बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक तहसिलदार मयूर राऊत होते तर अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी तथा माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग प्रमुख पाहुणे श्री घंटीबाबा संख्येचे अध्यक्ष डॉ प्रदीप मेहता टाईपिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंतराव सुर्वे पाटील युवा ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आतिक मौलाना तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड इरफान नौरंगाबादे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय मुजमुले मानवाधिकार पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पुजन करून करण्यात आले
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हातील पत्रकार संघटनेच्याअध्यक्षासह उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष जितेश बुरकुंडे प्रास्ताविक तालूकाध्यक्ष अजित महिंद्रे तर आभार संघटक किशोर कांबळे यांनी मांडलेयावेळी पुसद येथील पत्रकार युवा ग्रामिण पत्रकार संघटना तालूका अध्यक्ष यवतमाळ मार्मिक चे कुलदीप सुरोशे युवा ग्रामिण पत्रकार संघटनेचे व आवाज सत्याचा न्युज चॅनल मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर युवा ग्रामिण पत्रकार संघटना प्रसिद्धी प्रमुख तथा
- महाक्रांती न्युज पोर्टल जिल्हा प्रतिनिधी चे सिध्दार्थ कदम संघटक महाक्रांती न्युज पोर्टल चे अनिल पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अजित महिंद्रे अशोक जाधव किशोर कांबळे जितेश बुरकुंडे सिद्धार्थ जमदडे अरुण इंगोले अविनाश इंगोले शकील सदाशिव कांबळे रामदास पद्मावार अभय इंगळे जुबेर खान अमीन खान कलरवाले लूकमान खान पुरुषोत्तम कुडवे धर्मराज गायकवाड प्रशांत झोल सतिह पतलेवाले ज्ञानराज ढोरे सुरेश चिरडे अफजल खान प्रकाश सातघरे जय राठोड प्रफुल व्यवहारे कपिल इंगोले आकाश काशीकर सह जिल्हातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते