वर्धा विभाग प्रतिनीधी: – शंकर परचाके
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 2025 चे विज्ञान वार्षिक कॅलेंडर चे प्रकाशन वर्धा जिल्हाचे अप्पर जिल्हाधिकारी मा नरेंद्र स.फुलझले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्याच्याच दालनात प्रकाशन करण्यात आले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हि महाराष्ट्र भर व लगतच्या राज्यातील गुजरात, कर्नाटक, गोवा,मध्य प्रदेश आदी राज्यांतील मराठी भागासह अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी 350 च्या वर शाखेमध्ये काम करतात ज्यात सक्रिय काम करणारे 10,000 च्या वर कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे 7,000 च्या वर वर्गणीदार तर देणगीदार व जाहिरात दार अशे 10,000 चे वर हितचिंतक आहे तर समविचारी संस्था संघटना यांच्या सोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे घनिष्ठ संबंध आहे अशा संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही संख्या 20,000 त्यावर आहे सोबतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे पाठीराखे, हितचिंतक,प्रशंसक ,शाळा, महाविद्यालये यांचीही मोठी संख्या आहे अशा सर्वांची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विज्ञान ,पर्यावरण, पुरोगामी संत, विचारवंत यांच्या जयंती,निर्वाण, सोबतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्षभर जे जे समाजहिताचे, अनिष्ट रूढी परंपरा यांना योग्य पर्याय देवून सण, समारंभ साजरे करणारे उपक्रम समिती व्दारे वर्षभर राबविण्यात येणारे कार्यक्रम, शास्त्रज्ञांची माहिती त्यांनी लावलेले शोध, त्यांचे जन्मदिन मृत्यू यांचे दिनांक अशा आगळ्यावेगळ्या पणे माहिती देणारे महाराष्टातील पहिले पुरोगामी व विज्ञाननिष्ठ माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून देणारे एकमेव कॅलेंडर आहे याची माहिती सर्व सामान्यांना होण्यासाठी वर्धा येथे मा अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र स.फुलझले यांच्या हस्ते प्रकाशन करून त्याचे वाटप करण्यात आले यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रशिक्षण विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, जिल्हा प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे, विवेक वाहिनीच्या जिल्हा कार्यवाह डॉ मंजुषा देशमुख,वर्धा शहर कार्याध्यक्ष लाॅयर कविता राठोड, कार्यकर्ता श्री कांत नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.