अनिल पवार पुसद शहर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकतीच राज्यमंत्री पदी नियुक्त झाल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार तथा नवनियुक्त आदिवासी विकास , उद्योग , सार्वजनिक बांधकाम , उच्च शिक्षण , पर्यटन , मृद व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील मनोहराव नाईक यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. आदिवासी समाज ह विकासापासून कोसो दूर आहे त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मी त्या आदिवासी खात्याचा मंत्री म्हणुन तत्पर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन इंद्रनील नाईक यांनी केले. मागील पाच वर्षात इंद्रनील भाऊंनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कामे केलीत त्यामध्ये प्रकल्प कार्यालय , शासकीय वसतिगृह , शासकीय आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर या सर्व शासकीय इमारत बांधकामासाठी 40 कोटीहून अधिक निधी खेचून आणला. गाव , वाड्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन घेऊन विविध विकास कामे केलीत. येणाऱ्या काळात मंत्री म्हणुन पून्हा समाजाच्या अनंत अपेक्षा असुन राहिलेली काही प्रमुख कामे लवकरात लवकर सोडविण्यात येणार असल्याचे नाईक म्हणाले. आजपर्यंत आदिवासी समाजाच्या विकास होण्यामागे नाईक घराणे नेहमी तत्पर राहिले आहे. पुसद शहरात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला वाढीव जागेसाठी नेहमी पाठपुरवठा केला आहे. त्यांनी ग्रामीण आदिवासी बहुल विकास अनेक विकास कामे खेचून आणली आहेत एकंदरीत आदिवासी समाजाप्रती नाईक घराणे प्रामाणिक आहे. मुख्यमंत्र्यापासून ते मंत्रिपदापर्यंत चालत आलेला वारसा शेवटी इंद्रनिलभाऊ नाईक यांनी जिवंत ठेवला. यांनी पुसद विधानसभेत विकास कामे खेचून आणली कार्यकर्त्यांचा विश्वास जपून ठेवला माणसे जोडण्याचं काम त्यांनी केल त्यांच्या अर्धांगिनी सौं मोहिनीताई नाईक यांनी गावोगावी जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना आखत इंद्रनील भाऊच्या माध्यमातून त्या सोडवल्या अशा विविध माध्यमातून जनसामान्याची सेवा करणारे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक यांना राज्यमंत्री पद मिळाले
यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी परिषद परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुनिल ढाले , आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी काका , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कुणाल बनसोडे , गजानन उघडे , डॉ भुरके , , गजानन फोपसे , संजय डुकरे , संतोष गारुळे , राजू गायकवाड , आशिष बोके , राजू तडसे , राजेश ढगे , किसन भुरके , भास्कर मुकाडे , मधुकर मोरझडे , विजय इंगळे , दादाराव चिरंगे , बोरचाटे दानी पांडे , अशोक तडसे , सुरज मोहेकर , राजू इंगळे , सत्यभान तायवाडे , किसन काळे , , तातेरावं भडंगे , अशोक तडसे , बालाजी उघडे , बबलू मळघणे , संदीप कोठुळे , शरद ढेंबरे , राजेश बर्गे , आनंदरावं वाघमारे , अनिल इंगळे , काशिनाथ बोके। बाळू इंगळे , अनिल ढाले , अमोल दुम्हारे , रंगराव डाखोरे , मिथुन पांडे सह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. आदिवासी समाजाचे कर्मचारी, राजकीय पदाधिकारी,आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी, विध्यार्थी सर्व उपस्थित होते.चौकट इंद्रनील भाऊ नाईक यांनी समाजाचे हित जोपासत आदिवासी समाजासाठी कोट्यावधी चा निधी पुसद तालुक्यातील आदिवासी बांधवासाठी उपलब्ध करून दिला आहे. इंद्रनीलभाऊ सारखा शांत संयमी आणि जनतेचे काम करणारा राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाला मिळाला याचे समाधान आहे. येणाऱ्या काळात विविध आदिवासी समाजाचे प्रशंसनीय कामे होणार असा विश्वास आहे. अँड. सुनील ढाले जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास परिषद.