यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-कैलास कोडापे
आष्टोणा येथील श्रीमती विद्या विजय सुर ही महीला आठ अ पट्टा मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसली होती . दिनांक १९-१-२५ रोजी गटविकास अधिकारी ,ठाणेदार व सचिव ग्रामपंचायत आष्टोणा, उपसरपंच हे उपोषणकर्त्या महिलेशी मागण्या संदर्भात चर्चा करीत असतांना सचिव आरती वडुले यांनी आष्टोणा येथे रोजगार सेवक अमोल गाताडे याला मोबाईल वर रेकॉर्ड करायला लावले असता सदर रोजगार सेवक हा अधिकारी व उपोषणकर्ता महीलेशी चर्चेची मोबाईल रेकॉर्ड करीत असतांना उपोषणकर्ता महिलेचा नातेवाईक योगेश सुधाकर पावडे (भाऊ ) व सुधाकर पावडे वडील यांना रोजगार सेवक यांच्या हातातुन मोबाईल हिसकावून तोच मोबाईल त्याचा अंगावर मारला व अंगावर जाऊन कानपटात मारली .
यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, सुखदेव भोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी, उपसरपंच, सचिव ग्रामपंचायत आष्टोणा तसेच पत्रकार पण हजर होते. सदर घटनेत रोजगार सेवक यांना गंभीर दुखापत झाली आहे.त्यामुळे सदर घटनेचे निषेध करीत सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा .व यापुढेही असे शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करीत असलेल्या रोजगार सेवकाला कोणतेही मारहाण किंवा प्राणघातक हल्ला होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना शाखा राळेगाव यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव,गटविकास अधिकारी, तहसीलदार, पत्रकार व पोलिस स्टेशनला यांना सदर मारहाण करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करुन कार्यवाही करण्याची निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे विलास पवार अध्यक्ष, प्रविण खेवले उपाध्यक्ष,राजु लांडे सचिव व राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.