मा. महाराष्ट्र राज्य नगर विकास सचिव कार्यालय मुंबई..,
मा.राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा मा. पंकज भोयर
मा. जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
मा.. सी .ओ. जिल्हा परिषद कार्यालय वर्धा
विषय.. मा. नाचणगाव ग्रामविकास प्रशासकीय अधिकारी हे आणि दर्गा विरुद्ध केलेली तक्रार या लोकांसोबत संगणमत करून मुस्लिम बांधव सर्वधर्मसमभाव लोकांचे भावना दुखवायचे तसेच पदाचा दुरुपयोग करून नाचणगाव येथे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम प्रशासकीय अधिकारी तसेच तक्रारदार करत आहे सदर घटनेची नोंद घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती व दर्गा परिसरातील गेट व खांब याला धक्काही लागल्यास समाज बांधव चुप बसणार नाही याची नोंद घ्यावी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास नाचणगाव ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी स्थानीय प्रशासन जबाबदार राहणार…..
नाचणगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी तर्फे दिनांक 10/1/25 व 20/1/25 सदर नोटीस आताऊल्ला खान जफर उल्ला खान यांना देण्यात आले जे की असविधानिक आहे सदर मजार ही पुरातकालीन असून तेथे नाचणगाव तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातील लोकांच्या भावना जोडलेला आहे सदर मजार चे बांधकाम कच्च्या स्वरूपाचे आजपर्यंत आहे नागरिकांनी स्वयम इच्छेने साफसफाई राहावी म्हणून कच्चे आणि तार बांधून जनावरापासून सुरक्षा राहावी त्याकरिता कुंपण दहा ते पंधरा फुटावर केले आहे दर्ग्याच्या समोरील हॉल असल्याने तेथील सांड पाणी खराब अन्नधान्य ते दर्ग्यासमोर टाकायचे व आजूबाजूतील परिसरातील कचरा सुद्धा तेथेच मोठ्या प्रमाणावर जमा व्हायचा यामुळे ते खाण्यासाठी जनावरांची तुंग गर्दी होत असल्याने ते सर्वत्र दर्ग्याच्या आजूबाजू पसरवयाचे कित्येकदा तो कचरा मजार पर्यंत सुद्धा गेलेला आहे याकरिता मजार च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी स्वयम इच्छेने कच्चे ताराचे कुंपण घातले परंतु ते काही जातीवादी लोकांना पटले नाही आणि त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला सदर तक्रार नाचणगाव ग्रामपंचायतला देऊन राजकीय दबाव आणून मुस्लिम बांधव तसेच सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखवायचे काम करत आहे यामध्ये ग्रामीण प्रशासकीय अधिकारी दोन्ही समाजाच्या भावना न समजून घेता बळजबरीने पदाचा दुरुपयोग करून नोटीस पाठवीत आहे जे की असविधानिक आहे 13/1/25 ला दर्गा देखभाल करणारे नागरिक तसेच तक्रारदार यांना बोलून आपसी समझोता केलं व हे दर्गा देखभाल करणाऱ्याला मान्य आहे असे खोटे नोटीस दिनांक 20/1/25 ला आताऊल्ला खान ला पाठवले जे असविधानिक आहे मीटिंगमध्ये समझोता झालेल्या नाही व त्यांना हे मान्य आहे सदर बाब हे प्रशासकीय अधिकारी सामोर बोलून आले परंतु प्रशासकीय अधिकारी द्वारा त्यांना दी.20/1/25 नोटीस देऊन तीन दिवसाची वेळ देण्यात आले आणि सदर कुंपण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी झाली. सदर नाचणगाव ग्रामपंचायत नकाशा मध्ये दर्गेजवळ रस्ता नाही असे दिसत असून खोट्या रस्त्याची मागणी ग्रामपंचायत द्वाराच होत आहे दर्ग्यासमोर तलाव असल्यास तेथे आजूबाजूच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रम करून ठेवले आहे त्यावर दखल न घेता दर्गः टेकडीवर असून जाणून-बुजून नाचण गावातील वातावरण खराब करण्याचे काम चालू आहे प्रशासकीय अधिकारी यांच्या मते यांनी पाहणी केली असता तेथे देखभाल करणारे दर्ग्यातील कोणतीही लोक उपस्थित नव्हते सदर कचरा घाण अन्नामुळे मजारची विटंबना न व्हावी याकरिता कच्चे कुंपण करण्यात आले परंतु सदर कच्चे कुंपण काढल्यास जनावरे घाणकचरा व तक्रारदार हे समाजामध्ये तेढ निर्माण करिता कधी पण मजारची विटंबना करू शकते सदर बाबी गृहीत धरून जिल्हा अधिकारी कार्यालय मार्फत समिती गठित करून तक्रारदार प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच जागेची पाहणी करून समाजामध्ये समतोल रहावे याकरिता उचित निर्णय घेण्यात यावे आणि सदर समिती गठीत आणि निर्णय होईल परंतु ज्या परिस्थितीमध्ये कामकाज आहे त्या परिस्थितीमध्ये राहू द्यावे व दिलेल्या नोटीस वर त्वरित स्थगिती आणावी ही विनंती
अन्यथा भीम आर्मी मुस्लिम बांधव सर्वधर्मसमभाव नागरिक तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी…..
प्रतिलिपी. पोलीस महानिरीक्षक कार्यालय नागपूर,पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा, पोलीस उपविभागी कार्यालय पुलगाव, पोलीस पोलीस स्टेशन पुलगाव