महाक्रांती न्यूज 24 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-कैलास कोडापे
कै.लक्ष्मणराव मानकर स्मुर्ती संस्था विदर्भ,नागपूर एकलव्य एकल विद्यालय विभाग पांढरकवडा केंद्र वांजरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालक पालक मेळावा तथा सांस्कृतिक स्नेसंमेलन जिल्हा परिषद शाळ महांडोळी येथे दिनांक १९/०१/२०२५ रोजी आयोजीत करण्यात आला
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थांचे शैक्षणिक,शारीरिक, सामाजिक आणि बोद्धिक सर्वांगीण विकास व्हावा या संकल्पनेतून बालक पालक मेळावा आयोजीत केले आहे.या मेळाव्यात विविध स्पर्धेचे आयोजन केले होते,जसे कबड्डी,रणींग,निंबु चमच,संगीत खुर्ची,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,आणि यात प्रथम द्वितीय आणि तृतीय बक्षिक संस्थेकडून मुलांना दिले जातात.एका केंद्रातील दहा उपकेंद्राचे सर्व शिक्षक,विद्यार्थी आणि सर्व पालकांना आमंत्रित केले जाते.आणि सर्वांची भोजनाची व्यवस्था केली जाते.आणि संध्याकाळ ला मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मेळावा जेथे वर्ग सुरू आहे तेथून लोक निधीच्या माध्यमातून राबविला जाते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वांजरी येथील सरपंच सौ. इंदिराताई आत्राम,उपाधक्ष श्री विनोद बोडेवार उप सरपंच वांजरी,प्रमुख अतिथी श्री अशोक कुमरे पुलिस पाटील वांजरी,मार्गर्शक श्री संजय पचारे जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक,सूरज ठाकरे विभाग पर्यवेक्षक,केंद्र पर्यवेक्षक श्री मामराज राठोड,गजानन शिंदे पो.पाटील,निखिल येरमे,वैशाली टेकाम,दिव्या ध्यावरतीवर,मीराबाई मडावी,मंगेश ठाकरे,केंद्र शिबला,झरी,माथार्जून,करंजी येथील पर्यवेक्षक,शिक्षक आणि केंद्र वांजरी येथील सर्व उपकेंद्राचे शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक वांजरी येथील केंद्र पर्यवेक्षक श्री मामराज जयरामजी राठोड होते तर सूत्र संचालन महांडोळी येथील शिक्षक श्री संतोष ध्यावरतीवार यांनी केले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्र पर्यवेक्षक श्री मामराज राठोड यांनी केले.